Pages

Wednesday, April 13, 2016

हजारजबाबी कालिदास

कवी कालिदास जसा प्रतिभासंपन्न कवी होता, तसा तो हजारजबाबीही होता. या कालिदासाला एका कलावंतीनीचे गाणे खूप आवडत असे. तो रोज तिच्याकडे गाणे ऐकायला जात. एक दिवस त्या कलावंतीने त्याला मासा आणायला सांगितले. तिला नकार देणे त्याच्या जीवावर आले होते. मग तो बाजारात गेला. एका पिशवीत त्या माशाचे तुकडे घातले आणि कलावंतीनिकडे चालू लागला. त्याचावर जळणाऱ्या एका गृहस्थाने त्याला विचारले, काय हो, या थैलीत काय आहे, कालिदास म्हणाला, रामायण. गृहस्थ म्हणाला, मग पिशवी ओली आणि रक्ताने मक्लेली कशी दिसते? यावर कालिदास म्हणाला, रामायानासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवल्यामुळे ती भिजून गेली. आणि रक्त म्हणाल तर राम-रावण युद्धात राक्षस मारले गेले, त्याचे ते डाग आहेत. गृहस्थ म्हणाला ठीक आहे, सगळं मान्य आहे, पण घाण वास कसला सुटला आहे? यावर कालीदस म्हणाला, राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांचा वास येतोय. यावर आपली जास्त शोभा न करण्यातच शहाणपणा आहे, असे समजून त्या गृहस्थाने तेथून काढता पाय घेतला.


तात्पर्य: हजरजबाबीपणामुळे त्रास देणाऱ्या लोकांना गप्प बसवता येते.

No comments:

Post a Comment