एका जंगलात एक सिंह आणि चार
हरणे राहत होती. सिंह सगळ्या प्राण्यांची शिकार सहज करत असे. पण या चार हरणांपैकी
एकाचीही तो शिकार करू शकत नसे. कारण ही हरणे नेहमी एकत्र असत. नेहमी एकमेकांच्या
अडचणीला, मदतीला जात असत. त्यामुळे ते चौघे एकत्र असताना त्याला शिकार जमत नसे. मग
एक दिवस सिंहाने त्या हरिणांना एकमेकांबद्दल चहाड्या सांगितल्या. खोट्या-नाट्या
गोष्टी सांगून त्यांची एकमेकांविषयी मने कलुषित केली. मग हळूहळू ती हरणे एकमेकांशी
बोलेनाशी झाली. त्यानंतर ती चरणे किंवा जंगलात एकत्र फिरणेही बंद झाली. एक दिवस
चार हरणे एकाच ठिकाणी चार कोपऱ्यात चारत असता, सिंहाने एकाला गाठले आणि मारू
लागला. हरीण पळू लागले. तेव्हा सिंह म्हणाला आता तुला वाचवण्यासाठी कुणीही येणार
नाही. तुझे तीन मित्र तुझाशी भांडले आहेत. तुमच्यातील एकी नष्ट झाली आहे. इतक्यात
बाकीच्या तीन हरणांनी हे संभाषण ऐकले. सुदैवाने एका शिकार्याने बंदुकीच्या फैरी
झाडल्या. बंदुकीचा आवाज ऐकून सिंह धूम पळाला आणि चारही हरणांचा प्राण वाचला.
तात्पर्य: एकीच्या बळाने
बलवान शत्रूही घाबरतो.
No comments:
Post a Comment