Pages

Friday, April 8, 2016

समुद्राचा थेंब

ही गोष्ट आहे समुद्राची. समुद्राच्या लता उसळत असताना पाण्याचा एक मोठा थेंब त्या लाटून उसळला आणि किनाऱ्यावरील वाळूवर येऊन पडला. तेव्हा तो मोठ्या आनंदात होता. या अफाट पाण्याच्या बद्धतेतून आपण सुटलो, मुक्त झालो अशा आनंदात तो बेहोष झाला. आता आपण वाटेल तिकडे भटकू शकू, वाटेल तसे वागू शकू असे बरेच मनोरे, कंगोरे तो बांधत होता. पण शेवटी त्याला सत्याला सामोरे जावे लागले. थोड्याच क्षणाचा त्याचा हा आनंद ओसरला. तडफडत, तापात, चटके खात खात तो नष्ट झाला. समोरच्या अफाट समुद्राकडे पाहत पाहत तो म्हणाला, “आता मला माझी सुरक्षितता कळली.” पण थोड्याच दिवसात एका पाहटे दवबिंदूच्या रुपात तोच थेंब समुद्रात उतरला. थेंबाचा समुद्र झाला. भव्य, अफाट, झाला आणि मग म्हणाला, “आता मी समुद्र आहे. मी स्वतः जगेन. स्वतःला तरीनच, पण माझ्या पाठीवर असणाऱ्या मोठमोठ्या जहाजानासुद्धा आश्रय देईन. त्यांना या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याकडे सुरक्षितरीत्या नेऊन सोडेन. एकत्र राहण्याचे शिक्षणच माणसाच्या आयुषचा समुद्र करेल. सर्वाना बरोबर घेऊन जाण्यानेच समाजाची प्रगती साधेल.


तात्पर्य: आयुष्याचे संकुचित डबके करण्यापेक्षा त्याला समुद्रासारखेच विशाल करा.  

No comments:

Post a Comment