Pages

Tuesday, March 29, 2016

गुढीपाडवा

हिंदू वर्षाचा आरंभ म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुडी पडव्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रातील लोक आपल्या घरासमोर गुढी उभी करतात, तसेच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये हाच सण उगादी या नावाने लोक साजरा करतात.

हिंदूंची अशी मान्यता आहे की भगवान ब्रम्हदेव यांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. प्रभू श्री राम याच दिवशी चौदा वर्षे वनवास भोगून व रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला. म्हणून या दिवशी प्रत्येक दारात गुढी उभी केली जाते.


गुढी म्हणजे काय?

गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच वेळूची काठी वापरून तयार केली जाते. वेळूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे/तांब्या लावले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. गुढी हे मांगल्याचं, पवित्र्याचं, समृद्धीचं प्रतिक आहे.

गुढीची पूजा केलेनंतर दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळी सूर्यास्तावेळी पुन्हा फुले अक्षता वाहून गुढी उतरवली जाते.


चैत्र महिना मराठी हिंदू वर्षातील पहिला महिना. त्या महिन्यांतला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी पंचांग पूजन केले जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे ह्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात व नवीन शुभकार्याचा आरंभ करतात.

No comments:

Post a Comment