एका गावात एक दारुडा माणूस
राहत होता. त्याला खूप दारूचे व्यसन होते. एक दिवस गावातील सर्व लोकांनी मिळून
गावात दारूबंदी केली. म्हातारा खूप अस्वस्थ झाला. द्याला दारू प्यायला मिळेना.
त्याने त्याचा मुलांना शेजारील गावून दारू आणून द्यायला सांगितले. पण त्याचा
मुलांनी ठरवून ठेवले होते की, जर संपूर्ण गावात जर दारू बंदी आहे तर आपण आपल्या
वडिलांना दुसरीकडून दारू आणून द्यायची नाही. जर आपण त्यांना दुसऱ्या गावातून दारू
आणून दिली तर त्यांना पुन्हा व्यसनाच्या दरीत ढकलल्यासारखं होईल. म्हणून मुलांनी
त्याला दारू देण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता आपल्याला दारू प्यायलाच मिळणार नाही
म्हणल्यावर म्हातारा शांत बसला. मग त्याला खुच अस्वस्थ वाटल्यावर एक युक्ती सुचली.
तो तिथल्या एका दारूच्या दुकानात गेला व तिथल्या रिकाम्या पिम्पातील दारूचा वास
घेऊ लागला. असे तो रोज करत असे. काही दिवसांनी त्या पिंपाचा खूप घाण वास येऊ लागला
व त्याला उलट्या होऊ लागल्या. मग मात्र, तो म्हणाला माझी मुले म्हणत होती तेच
बरोबर आहे. आपण आता पूर्ण निर्व्यसनी व्हायला पाहिजे. नाही तर या घाणेरड्या वासाने
उलट्या करून आपला जीव जाईल.
तात्पर्य: वाईट सवय सोडणे
अवघड असते पण अशक्य नसते.
No comments:
Post a Comment