Pages

Wednesday, March 23, 2016

शिमगा (होळी)

शिमगा किंवा होळी हा महाराष्ट्रातील प्रमुख साणांपैकी एक सन आहे. मराठी वर्षाच्या फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला शिमगा साजरा केला जातो. शिमगा हा “शिमगोत्सव” म्हणून देखील प्रसिद्ध आहे तसेच भारतातील इतर भागात “होली” या नावाने साजरा केला जातो. हा उत्सव ५ दिवस चालतो. या दिवशी होळी दहन केली जाते. होळी हा शब्द “होलिका” या नावावरून आला आहे. होलिका ही हिरण्यकश्यपू याची बहिण होती. तिने हिरण्यकश्यपूचा मुलगा “भक्त प्रल्हाद” याला मारण्याचा प्रयत्न केला होता. होळी दहन करताना प्रत्येकाच्या मनात आपला त्रास संकट आणि वाईट गोष्टी होळीसोबत दहन झाल्याची भावना असते.

कोकणात तसेच गोव्यात हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. लोक आपली घरे रंगवतात सजवतात, आणि दारात रांगोळी काढतात. सार्वजन एकमेकांना शुभेच्छा देतात. या दिवशी देवाची पालखी गावातील प्रत्येकाच्या घरी येते. घरातील सर्व लोक देवाची प्रार्थना करतात. हा सन साजरा करण्याची पद्धत व परंपरा प्रत्येक ठिकाणी वेग-वेगळी आहे. 


तसेच पंचीमीच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेनंतर येणाऱ्या पाचव्या दिवशी “रंगपंचमी” साजरी केली जाते. या दिवशी सर्व लोक रंग उधळतात तसेच एकमेकांना रंग लावतात. 

No comments:

Post a Comment